जागतिक टेबलटेनिस स्पर्धेत मुंबईचे योगेश देसाई विजयी



मुंबईओमानमस्कत येथे झालेल्या आयटीटीएफ वयस्करांच्या (व्हेटरन्सजागतिक टेबलटेनिस स्पर्धेत पुरुषांच्या 70 हून अधिक वयोगटातील एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे मुंबईचे योगेश देसाई यांनी सुवर्णपदक पटकावले.
अंतिम फेरीत योगेश यांनी चेक रिपब्लिकच्या मिलॅन रॅकॉविकी यांच्यावर 3-1(9-11, 11-9, 11-7, 13-11) असा विजय मिळवलाउपांत्य फेरीत योगेश यांनी ऑस्ट्रियाच्या रिनहर्ड सॉर्जर यांच्यावर 3-2 अशी मात केली.
या स्पर्धेत भारताने 24 पदकांची कमाई केलीत्यात 6 सुवर्णतितकीच रौप्य आणि डझनभर कांस्यपदकांचा समावेश आहेपदकविजेत्यांमध्ये उल्हास शिर्के आणि पिनाकिन संपत या महाराष्ट्राच्या जोडीचा समावेश आहेत्यांनी 70हून अधिक गटात पुरुष दुहेरीत सुवर्ण कामगिरी साकारली

Post a Comment

Previous Post Next Post