महाराष्ट्रातून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत दिक्षा सुवर्णा प्रथम

  •   ९९.६ टक्के गुण मिळविल्याबद्दल दिक्षाचा सत्कार 

    डोंबिवली :  डोंबिवलीतील होली एंजल स्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणी साठी संस्कार केले जात असून हे राष्ट्रासाठी मोठे योगदान आहे असे प्रतिपादन कॅबिनेटमंत्री  रवींद्र चव्हाण यांनी केले.पूर्वेकडील गांधीनगर विभागातील होली एंजल स्कूलचा दोन दिवसीय वार्षिकोत्सव संपन्न झाला. यावेळी दिक्षा सुवर्णाने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९९.६ टक्के गुण प्राप्त करुन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या  दिक्षा सुवर्णाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर होली एंजल शाळेचे संस्थापक  डॉ. ओमेन डेविड, लीला ओमेन, बीजाॅय ओमेन, रोटेरीअन डिस्ट.गव्हर्नर कैलास जेठाणी, मुख्याध्यापक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांचे पालक, होली एंजल शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नांमुळे दिक्षा सुवर्णाने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ९९.६ टक्के गुण प्राप्त करुन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक आणि खेळात देखील आंतरराज्यीय स्तरावर अग्रेसर आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. डोंबिवलीतील होली एंजल स्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाकडून राष्ट्र उभारणी साठी संस्कार केले जात आहेत. संस्थापक ओमेन डेव्हीड, लिला ओमेन यांना शैक्षणिक क्षेत्रातील दिर्घ अनुभव असल्याने राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी घडत आहेत.यावेळी वार्षिकोत्सवात दिक्षा सुवर्णा हिचा  मंत्री  चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक आणि खेळात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा लिला ओमेन आणि ओमेन डेव्हिड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या दोन दिवसीय वार्षिक उत्सवात विद्यार्थ्यांनी आपापल्या कला सादर केल्या. या उत्सवासाठी दोन दिवस पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात उपस्थित होता.



Post a Comment

Previous Post Next Post