दिव्यातील अनधिकृत बांधकामाचे आयुक्तांपुढे सर्वात मोठे आवाहन

 


  • परिणामकारक पध्दतीने अनधिकृत बांधकामांवर अंकुश मिळवणे सोपे

दिवा / आरती परब : शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत फक्त तक्रारींच्या आधारावर किंवा अधूनमधून कार्यवाही न करता ती दररोज होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन परिणामकारक पध्दतीने अनधिकृत बांधकामांवर अंकुश मिळवणे सोपे होईल. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत आपण केलेल्या किंवा न केलेल्या कार्यवाहीचा परिणाम फक्त अनधिकृत बांधकामे वाढण्यापुरता किंवा कमी होण्यापुरता मर्यादित न राहता त्याचा परिणाम भविष्यात होवू शकणारी दुर्देवी घटना ज्याच्या माध्यमातून जीवितहानीसुद्धा होवू शकते अशी घटना टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. मात्र त्यांच्या आवाहनाला दिवा प्रभाग समिती हद्दीतील बांधकामांवरील कारवाईचे सर्वात मोठे आवाहन असणार आहे.

एक वेळ येथील नागरीकांना पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र अनधिकृत बांधकाम बांधण्यास किंवा ते विस्तारण्यास पाणीच पाणी मिळते. एवढ अनधिकृत बांधकाम दिव्यासारख्या क्षेत्रात दिवसागणिक वाढू लागलेले पहायला मिळत आहे. जणू दिवा ही अनधिकृत बांधकामाची पंढरीच झाली आहे. या क्षेत्रात डोळ्यासमोर अनधिकृत बांधकामांचे इमले वाढत असूनही या अनधिकृत बांधकामांच्या आजूबाजूने ठाणे महानगरपालिकेचे तथा दिवा प्रभाग समितीचे अधिकारी फिरतच असतात. परंतु त्या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यावर कानाडोळा ते करीत असतात.

आता ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवी मुंबईचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्विकारलेला आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या बैठकीत नियमीत कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत. त्यात त्यांनी शहरात झाडाझडतीचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये विविध स्तरावर अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन दिल्या असून उपआयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण नियंत्रण निमुर्लन पथक कार्यरत राहणार आहे. प्रत्येक प्रभागात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची व्यक्तीश: जबाबदारी ही सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी यांचा देण्यात आली आहे. प्रभागाची बीटनिहाय विभागणी करुन प्रत्येक बीटमध्ये बीटनिरीक्षक व बीटमुकादम नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीटनिरिक्षकाची परवानगी नसेल अशी प्रकरणे संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या किंवा सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याचे आदेश दिले आहेत.प्रभाग अधिकाऱ्याने याबाबत तपासणी करुन जर ते समाधानकारक आढळले नाही, तर नियमानुसार संबंधितांना नोटीस द्यावी, व संबंधित व्यक्ती नोटीस कालावधीत कागदपत्रे सादर न करु शकल्यास त्या गुन्ह्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. प्रभागस्तरावर बीटनिहाय नोंदवही ठेवण्यात यावी. या नोंदवहीमध्ये त्यांच्या बीटमधील अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण इ नागरी गुन्ह्याशी संबंधित घटनेची नोंद ठेवावी तसेच न केल्यास संबंधित बीट निरीक्षकास जबाबदार धरण्यात यावे. तसेच बीटमध्ये अतिक्रमण अनधिकृत बांधकामाची एकही घटना निदर्शनास न आल्यास त्यांचीही नोंद बीट रजिस्टरमध्ये करण्याची जबाबदारी बीट निरीक्षक व बीट मुकादमाची राहील.

अभिजीत बांगर, 

आयुक्त, ठाणे महानगरपालिका 



Post a Comment

Previous Post Next Post