वीजचोरांवर महावितरणची धडक कारवाई


भांडूप परिमंडलात १८.४८ कोटींची ५,६७० वीजचोरींची  प्रकरणे उघडकीस

भांडूप : महावितरणची थकबाकी वाढत असून वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष देणे सर्व परिमंडलांना भागच आहे. पण वीजेचा अनधिकृत वापर रोखणेही तितकेच महत्वाचे आहे. भांडूप परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्न करून वीजबिल वसुलीवर भर देत आहेत. याशिवाय, वीज जोडणी तपासणी, ०-३० रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणी मध्ये भांडूप परिमंडलात माहे १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ व कलम १३५ तसेच आकडा टाकून असे एकूण १८ कोटी ४८ लाखाची  वीजचोरीची ५६७० प्रकरणे उघडकीस आली आहेत. 

भांडूप परिमंडलात  १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार भांडूप परिमंडलात  ५०,१९,९४२  युनिटची ९ कोटी ८८ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडल कार्यालया अंतर्गत ६५४  प्रकरणात ३ कोटी २४ लाख, वाशी मंडल कार्यालयात १,०७५  प्रकरणात ४  कोटी  ५७  लाख व पेण मंडल कार्यालयात ६८६ प्रकरणात २ कोटी ०६ लाखाची वीजचोरी पकडली आहे. याशिवाय, विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६  नुसार ठाणे मंडल कार्यालयात १७०१ प्रकरणात ४  कोटी ११ लाख, वाशी मंडल कार्यालयात ६४६ प्रकरणात २ कोटी ३२ लाख तर पेण मंडल कार्यालयात २६१ प्रकरणात ७३.४८ लाख असे एकूण २६०८  प्रकरणात ७ कोटी १८ लाखाचा अनधिकृत विजेचा वापर आढळून आला आहे. या शिवाय आकडा टाकून वीजचोरी  करण्याचे ६४७ प्रकरणे समोर आली आहे.  या मध्ये  १ कोटी ४२ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. सदर मोहिमेत मुख्य अभियंता श्री.सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अति.कार्यकारी अभियंता, सहा.अभियंता व लाईनस्टाफ पर्यंत प्रत्येकांनी विशेष मेहनत घेतली आहे. 

"वीजचोरी रोखणे हे महावितरणपुढे एक मोठे आव्हान आहे. महावितरणने वीज चोरांवर तीव्र कारवाई सुरु केली असून ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे प्रामाणिकपणे भरले पाहिजे. वीजचोरी सारख्या अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनविरुद्ध विद्युत कायदा २००३ प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाईत वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना दंड व कठोर शिक्षा होऊ शकते. ग्राहकांनी वीजचोरी सारख्या कृत्यापासून दूर राहावे” असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.सुनील काकडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post