डोंबिवली : शहराला हादरून टाकणारी डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील लैगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी ४८ तासात दोघांना अटक केली.यातील एका आरोपीला नेवाळीतून व दुसऱ्याला डोंबिवली पूर्वेकडून पकडून बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेवाळी येथे राहणारा विष्णू सुभाष भांडेकर (25), आणि नांदिवली परिसरात राहणारा आशिष प्रकाशचंद्र गुप्ता (32) अशी दोन आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील खाडी किनारीलागत निर्मनुष्य ठिकाणी गेले असता दोघा नराधमांनी मुलीवर लैगिक अत्याचार केला.पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलीस दोघा नराधमांना शोधण्यास सुरुवात केली.त्या परिसरात त्यादिवशी किती फोन ॲक्टिव होते याचा अंदाज पोलिसांनी घेतला. त्यानंतर पीडित मुलीने दोघा नराधमांनाकडे कोणत्या कंपनीचा फोन होता ते पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी हाच धागा पकडत त्यांनी त्या दिशेने तपासला सुरुवात केली.यातील अटक केलेला विष्णू याच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.दोन महिन्यापूर्वी भांडेकर याने नेवाळी येथे एका घरात चोरी केली होती. विशेष म्हणजे त्या घरात काहीच दिवसात लग्न होणार असल्याचे त्याने हेरले आणि घरातील संपूर्ण दागिने त्याने लुटले होते.तर दुसरा आरोपी आशिष याचे डोंबिवलीत चहा टपरी आहे.दोघांची वर्षभरापूर्वी ओळख होती.दोघांमध्ये मैत्री झाल्यावर त्यांनी निर्जनस्थळी फिरण्यास सुरुवात केली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघा नराधमांना अटक केली.मात्र समाजाच्या भीतीने आजही अनेक मुली अश्याया असतील त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्या नसतील.मुलींनी अश्या निर्जनस्थळी नये.मुलींना कोणी रस्त्यात त्रास देत असतील तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे डोंबिवलीत सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.