कल्याणमध्ये साकेत मॅग्नोत्सवाला उत्साहात सुरुवात


दिवा : कल्याण पूर्व येथील साकेत ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या विविध शाखाद्वारे दि.२८-०१-२०२३ ते ०४-०२-२०२३ या कालावधीत साकेत मॅग्नोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सदर उत्साहात साकेत महाविद्यालय, साकेत कनिष्ठ महाविद्यालय, साकेत मॅनेजमेंट कॉलेज, साकेत इंग्लिश हायस्कूल यांचा सहभाग आहे.

    या उत्साहात कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा व रोहक उत्साह अंतर्गत विविध आंतरमहविद्यलयीन स्पर्धाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. साकेत कुमार (सचिव साकेत ज्ञानपीठ) यांनी केले असून प्रसंगी कार्यक्रमाला सी. ई. ओ. श्रीमती शोभा नायर, प्राचार्य डॉ. वंसत भराटे, प्रमोद राम तिवारी, साकेत मॅनेजमेंट कॉलेजचे संचालक डॉ. सनोज कुमार, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य मोर्य, साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ममता सिंग, साकेत नर्सिंग कॉलजचे प्राचार्य पद्मजा कदम, मुळे सर, राणी मॅडम प्रसिना मॅडम, दिव्या नायर मॅडम, डॉ. श्रीकेश पुजारी, चौधरी सर, कांबळे सर, गणेश परब सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


Post a Comment

Previous Post Next Post