भारतीय संघ ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये


सेंट जाॅर्ज पार्क :  दक्षिण आफ्रिकेतील घुबेरहा इथे झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडचा डकवर्थ लुईस पद्धतीने 5 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये धडक मारली. भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा (2018, 2020 आणि आता 2023) वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये आगेकूच केली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारून डावाला सुरुवात केली. टीम इंडियाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली.  स्मृती मानधनाच्या ८७ धावांच्या जोरावर भारताने १५५ धावांचा डोंगर उभारला होता स्मृती आणि शेफाली यांनी यावेळी ६२ धावांची सलामी दिली. शेफाली यावेळी २४ धावांवर बाद झाली आणि भारताला पहिला धक्का बसला. शेफाली बाद झाल्यावर भारताची कर्मधार हरमनप्रीत कौर १३ धावांवर बाद झाली, तर फॉर्मात असलेल्या रिचा घोषला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. दमदार सुरुवात झाल्यावरही भारतीय संघ आता अडचणीत सापडणार, असे वाटत होते. पण त्यावेळी स्मृती ही मैदानात ठाण मांडून उभी होती. विकेट्स पडत असल्या तरी स्मृतीने त्याची तमा बाळगली नाही. 

स्मृतीने एकामागून एक चेंडूंवर मोठे फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मृती यावेळी अर्धशतक झळकावून थांबली नाही. अर्धशतकानंतर स्मृतीच्या फलंदाजीला अधिक धार आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे स्मृती आता शतक झळकावणार असे वाटत होते, पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण अखेरच्या षटकांत धावगती वाढवण्यासाठी स्मृती सरसावली आणि तिचे शतक यावेळी १३ धावांनी हुकले. स्मृतीने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८७ धावांची खेळी साकारली. स्मृतीच्या या दणदणीत खेळीच्या जोरावर भारताला १५५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंडला रेणुका सिंगच्या पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. त्यामुळे त्यांची पहिल्या षटकात २ बाद १ धाव अशी दयनीय अवस्था झाली होती. आयर्लंडची २ बाद ५४ अशी स्थिती असताना पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार आयर्लंड पाच धावांनी पिछाडीवर होते आणि त्यामुळेच भारताला यावेळी विजयी घोषित करण्यात आले.



 

 







 सुरू असलेल्या . 

Post a Comment

Previous Post Next Post