दिवा \ आरती परब : भारतीय जनता पार्टी दिवा- शीळ मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांच्या पुढाकाराने आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वात आज दिव्यात शिवसेनेतील काही शाखाप्रमुख तसेच नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेनेत आलेल्या शाखाप्रमुखाला पक्षाकडून कोणतेही पद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आज भाजपाचा स्वीकार केला. त्यांनी कमळ हाती धरत आपल्या सोबत उत्तर भारतीय समाजातील अनेक नागरिकांनाही पक्षात प्रवेश करून घेतला.
अमितराज गुप्ता, भारतीय तेली शाहू राठोड समाज, मुंबई, रामचंद्र राम सावरे वर्मा, प्रदीप गुप्ता, महेश जोशी, राजू गुप्ता, रमेश गौतम, राहुल फाटक, कैलास जयस्वाल, लालेद्र भट, विकास पांडे, कमलेश गुप्ता, उमाकांत बिंद, संदीप राव मोरखडे, विनोद कुमार गुप्ता, राजेश गुप्ता, राज कारण, अजय कनोजिया, प्रेमचंद गुप्ता, राम आश्रम पटेल, उपेंद्र शहा, गीता राजेश गुप्ता, मिला अमित गुप्ता, छबी गुप्ता, दुर्गा नागेश सिंग, देना शाहू, पूजा वाघ, रमेश गुप्ता, दुर्गावती पिंटू गुप्ता, विभा सिंग, प्रकाश कनोजिया, श्वेता शाहू यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजप दिवा शीळ अध्यक्ष यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आजचा प्रवेश झाल्यामुळे दिवा परिसरात भाजपाची ताकद अधिक वाढल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रवेशावेळी नरेश पवार, महाराष्ट्र प्रदेश शिक्षण संस्था संयोजक, विजय भोईर उपाध्यक्ष, ठाणे शहर जिल्हा, अशोक पाटील, रोशन भगत, कार्यकारी सदस्य, सीमा गणेश भगत, समीर चव्हाण, मंडळ सरचिटणीस, सपना भगत, महिला मोर्चा अध्यक्ष, जयदीप भोईर, व्यापारी सेल अध्यक्ष, श्रीधर पाटील, ओ.बी.सी मोर्चा अध्यक्ष, अशोक गुप्ता, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम पार पडला. सुमित मडवी, दुर्गेश मडवी, आशिष पाटील, प्रणव भोईर, आकाश भोईर, गौरव पाटील, सुदेश पाटील नितीन कोरगावकर, रवी मुनणकर, ऋषिकेश अलीमकर, दीपेश पाटील, अवधराज राजभर, क्रांती सिंग, साईनाथ भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
