विष्णुनगर पोलीस ठाण्याची उल्लेखनिय कामगिरी
डोंबिवली \ शंकर जाधव : विसरलेले, गऱ्हाळ व चोरीचे असे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झालेले चार लाख रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी तपास करून शोधले. तक्रारादार यांना मंगळवार ८ तारखेला विष्णूनगर पोलिसांनी परत केले.आपले मोबाईल परत मिळाल्याबद्दल तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले.
कल्याण परिमंडळ - ३ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे व पोलिस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने सायबर सायबर गुन्हेतील गऱ्हाळ झालेले व चोरी झालेले मोबाईल शोधण्यास यश आले. पोलीस शिपाई रोहिदास शिंदे यांनी सुमारे २५० मोबाईल शोधले असून त्यांच्या या कामाचे पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ - ३ अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे यांनी त्यांचे कौतुक केले. तर तक्रारदार सामाजिक व महिला सक्षमीकरण अभियान महाव्यवस्थापक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त डॉ. अमित दुखंडे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पोलिसांचे हे काम कौतुकास्पद आहे.
