आमदार अतुल भातखळकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका
डोंबिवली / शंकर जाधव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर अनेक राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठवली गेली. याला उत्तर देत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांना बजेट मधील `बी` तरी समजतो का ? अशा शब्दात समाचार आमदार भातखळकर यांनी टीका केली. डोंबिवलीत भाजपच्या वतीने पार पडलेल्या अर्थसंकल्पीय प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते.
डोंबिवली पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद ( राणाप्रताप ) शाळेच्या सभागृहात भाजपा कल्याण जिल्हावतीने अर्थसंकल्पीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार भातखळकर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सांगताना गेल्या नऊ वर्षात मोडी सरकारने अर्थव्यवस्थेचा विचार करून जगात अर्थव्यवस्थेबाबत भारत देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावरआल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी पाहता भारत देश जागला तारक ठरणार असल्याचे त्यांनी विश्वासाने यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,आदित्य ठाकरे यांना बजेट समजत नाही. यावर्षीचे बजेट समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारे आहे असे सांगताना मुंबई महापालिकेचा अर्थ संकल्प सादर करायचा की नाही तो अधिकार आयुक्तांचा आहे असे त्यांनी सांगितले. सध्या पालिकेवर आयुक्तांची सत्ता असून सत्तेत असताना विकासकामे करायची नाही आणि आता आंदोलनाची भाषा करायची हे चुकीचे असल्याचे आहे.मुंबई शहरात फडणवीस यांच्या काळात 314 किलोमीटरचे मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये मेट्रोचे जाळे विणण्यास प्रारंभ केला हे कोणामुळे शक्य झाले. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार मिळून आहे. केंद्र सरकारमुळे आणि मोदींमुळे या मेट्रो प्रकल्पाला जपान सारख्या देशाने सॉफ्ट लोन दिलं. मुंबई शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नाव्हाशिव्हा शिवडी पार बंदर प्रकल्पाला बँक ऑफ जपानने कर्ज दिले. मुंबई आणि महाराष्ट्राला मोदींच्या कालखंडात जितकं मिळालं ते आत्तापर्यंत कधीच मिळालं नाही. हे आदित्य ठाकरे यांना व्यवस्थित माहिती आहे. ज्या कोस्टल रोडच ते कौतुक करतात तो बांधण्यासाठी परवानग्या केंद्र सरकारनेच दिल्या.या अर्थसंकल्पात सुद्धा महारष्ट्र, मुंबई आणि एमएमआर रिजन्मध्ये फार मोठी मदत मोदी सरकारने केली आहे असे सांगितले.
यावर्षीचा अर्थ संकल्प हा मध्यमवर्गीयांना नाही तर समाज जीवनातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा आहे. कोवीडच्या परिस्थितीतून बाहेर येऊन देशाला प्रगती पथावर नेणारा रोजगार देणारा असा अर्थ संकल्प आहे. मध्यमवर्गीयांना 7 लाखाचा स्लॅब करून मोठा दिलासा दिलाच आहे.
मुंबई महापालिकेवर आयुक्तांचे राज्य आहे. आयुक्त जो अर्थ संकल्प सादर करतील तो अंतिम असेल. आंदोलन करण्याची भाषा कोणी करू नये. मुंबईकरांना विकास महत्त्वाचा आहे. सत्तेत असताना कधी विकासकामे पूर्ण होऊ दिली नाही. आणि आता आंदोलनाची भाषा करायची हे अत्यंत हास्यास्पद आणि जनतेविरोधी आहे असे वक्तव्य आमदार भातखळकर यांनी केले.