अखेर अभिमन्यू- अक्षरा येणार समोरासमोर

  •  स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये रोमांचक ट्विस्ट 

अनेक नाट्यपूर्ण घटनांनी, स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या कहलाता है या शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या शोमध्ये अक्षरा आणि अभिमन्यू यांच्या प्रमुख भूमिकेत हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड आहेत, ज्यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या प्रेक्षकांनी विविध भावना आणि कथानकाचे रोमांचक ट्विस्ट अनुभवले आहेत. अक्षरा आणि अभिमन्यूची जोडी ही हे शोचे मुख्य आकर्षण आहे. पाच वर्षांच्या लीपनंतर कथानक नव्या वळणावर असून यामध्ये जय सोनी अभिनवच्या भूमिकेत आहे, जिथे तो अक्षराच्या पतीची भूमिका साकारतो आहे.

मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये, अभिमन्यूला कळते की अक्षराने तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे आणि ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे. आणि आता अभिमन्यू आणि अक्षरा विभक्त झाल्यानंतरच्या पाच वर्षांनी पुन्हा एकमेकांसमोर येत आहेत. त्यांच्यातील विभक्तपणासोबतच त्यांच्या डोळ्यातून प्रेम, निराशा आणि पुनर्मिलनाची भावना प्रतिबिंबित होताना दिसते.

चाहते आपली आवडती जोडी अभिमन्यु आणि अक्षरा एकत्र येण्याची वाट पहात असून त्यांच्यातील रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' स्टार प्लसवर सोमवार ते रविवार दर रात्री 9.30 वाजता प्रसारित होतो.



Post a Comment

Previous Post Next Post