दिवा : दिव्यातील गेली कित्येक दिवस मुंब्रा देवी कॉलिनी रोड (दातिवली चौक ते सेंट मेरी शाळेपर्यंत) रस्त्यावरती असलेल्या एस. टी. व एल. टी. लाईन्सचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत होता, विजेच्या लाईन वरती लोड आल्याकारणाने लाईन्स वारंवार तुटत होत्या. पावसाळ्यामध्ये या वायर मुळे आग लागणे, शॉर्ट सर्किट होणे वा रस्त्याने जाणाऱ्यांना विजेचा शॉक लागणे अशा दूर्घटना होत होत्या. या दुर्घटनेत जीवितहानी होण्याची ही शक्यता होती. ही बाब भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत यांच्या निदर्शनास तेथील स्थानिक रहिवाशांनी आणून दिली.
या गोष्टीची माहिती मिळताच रोशन भगत यांनी तत्काल टोरंट अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या समस्या सोडविण्याची विनंती केली. सततच्या पाठपुराव्यानंतर टोरंट अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून या समस्येवरती उपाय म्हणून रस्त्यावरील एसटी व एलटी विद्युत लाईन अंडरग्राउंड करण्याचे कामास सुरुवात केली.
रोशन भगत यांच्या पाठपुराव्याने सदर लाईनचे काम झाल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांनी रोशन भगत यांचे आभार व्यक्त केले असून त्याचबरोबर टोरंट अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी भाजपा अध्यक्ष दीवा मंडळ रोहिदास मुंडे, सरचिटणीस समिर चव्हाण, युवा मोर्चा सचिन भोईर, व्यापारी अध्यक्ष जयदीप भोईर, सौ सपना भगत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.