नाशिकहून विमानसेवा सुरू

  

15 मार्चपासून गोवा, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद येथे जाता येणार 
नाशिकहून आणखी सात शहरांकरिता विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो इच्छूक 

नाशिक  : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली इंडिगो कंपनीची गोवा, नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा येत्या 15 मार्चपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने तशी घोषणा करुन या सेवांसाठी 1 फेब्रुवारीपासून बुकिंग सुरू करण्यात आल्याचे सूचित करण्यात आले आहे. याबरोबरच आता नाशिकहून आणखी सात शहरांकरिता विमानसेवा सुरू करण्यासाठी इच्छूक असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नाशिकहून यापूर्वी एअर व स्पाइसजेट या विमान कंपन्यांची दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव व हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू होती. बेंगळुरू व गोव्यासाठीही
लवकरच सेवा सुरू केली जाणार होती. मात्र, केंद्र सरकारच्या उडान योजनेची मुदत संपल्याने अलायन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांनी २०२२ मध्ये सेवा बंद केल्या. स्टार एअरने आधीच सेवा बंद केली, तर अलायन्स एअरने २६ ऑक्टोबरला २०२२ पासून विमाने बंद केली होती. त्यामुळे केवळ स्पाइसजेटच्या दिल्ली व हैदराबाद या सेवा सुरू होत्या.

मात्र, त्या विमान सेवांबाबत प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी असल्याने ओझरहून विमानसेवा विस्कळीत झाली होती. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी नाशिकच्या विमानसेवेबाबत चर्चा केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनीही पत्रव्यवहार केला होता. दरम्यान इंडिगो या आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकहून सेवा सुरू करतानाच ती सेवा आणखी विस्तारित करण्याची घोषणा केली आहे. 

इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमधील प्रमुख २० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबोत बैठक घेतली. यावेळी नाशिककरांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी निमा, आयमा, तान, निटा, मी नाशिककर, क्रेडाई यांसारख्या प्रमुख २० संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

नाशिक-नागपूर विमान सेवमध्ये नागपूरवरुन 9.15 ला निघून नाशिक येथे 11 वाजता पोहोचणार आहे. तर तेच विमान नाशिकहून सायंकाळी 7.35 निघून नागपूरला रात्री 9.25 वाजता पोहोचणार आहे.

नाशिकहून गोव्यासाठी सकाळी 11.20 वाजता निघून दुपारी 1.10 मिनिटांनी गोवा येथे पोहोचणार आहे. तेच विमान गोवा येथून दुपारी 1.40 वाजता निघून दुपारी 3.35 वाजता नाशिकला पोहोचणार आहे.

नाशिकहून अहमदाबादसाठी दुपारी 3.45 वाजता विमान निघून ते अहमदाबादला 5.25 ला पोहोचणार आहे. तर परतीचा प्रवास करताना अहमदाबादवरुन ते 5.50 ला निघूून रात्री 7.15 ला नाशिकला पोहोचणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post