भाऊ कदम सोबत मालवणी नाटकात दिसणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता ओंकार भोजने आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. या नाटकातून तो भाऊ कदमबरोबर स्टेज शेअर करताना दिसेल.
चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रंगभूमीवर आपली वेगळी छाप पाडणारे अभिनेते भाऊ कदम आता ओंकार भोजने सोबत लवकरच ‘करून गेलो गाव’ या मालवणी नाटकामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘करून गेलो गाव’ या नाटकाला ही दोघे नव्याने रंगभूमीवर आणत आहेत.
या नाटकाची निर्मिती ही दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे करणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. अभिनेता ओंकार भोजने याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' तडकाफडकी सोडल्यामुळे तो अधिक चर्चेत आला.