छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जन्मोत्सवानिमित्त
डोंबिवली / शंकर जाधव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या 18 ते 30 वयोगटातील 50 दृष्टिहीन युवक युवतींसाठी शिवछत्रपतींचे जन्मोत्सवा निमित्त शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या सोहळ्यामध्ये सोबत नेण्यात आले.
शिवसैनिक व दृष्टिहीन युवक डोंबिवली शहर शाखेसमोर जमले. शिवसेना शहर शाखेच्या शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला दृष्टीहीन मुलांच्या वतीने शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करण्यासाठी शिवनेरी किल्ल्याकडे निघाले. यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे, शहर सचिव संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, विभाग प्रमुख समीर कवडे, शाखाप्रमुख वैभव राणे, धनाजी चौधरी, महिला सेनेच्या केतकी पोवार, उषा आचरेकर, शिवसैनिक रोहित जमादार, शैलेश चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत उपाध्ये, उपकार्यालय प्रमुख सागर बापट आणि कार्यालय प्रमुख प्रकाश माने इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक तसेच डोंबिवली शहरातील शिवप्रेमी नागरिक याप्रसंगी दृष्टीहीन युवक युवतींच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शहर समन्वयक जितेन पाटील व काही शिवभक्त यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले
.