गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर वॉटर टॅक्सीला सुरुवात

  •  २५० ते 350 रुपयात आरामशीर प्रवास 

 मुंबई:मुंबई पोर्ट अथॉरिटीने नयनतारा शिपिंग कंपनीला जल प्रवासी सेवा चालविण्यास मान्यता मिळाल्याने 
गेटवे ऑफ इंडियावरून बेलापूर थेट वॉटर टॅक्सीने गाठता येणे शक्य होणार आहे. शनिवार पासून गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूरपर्यंत वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात झाली आहे.
नयन इलेव्हन’ असे या वॉटर टॅक्सीचे नाव असून या वॉटर टॅक्सीमध्ये खालच्या डेकवर १४० प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर आणखी ६० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.  खालच्या डेकसाठी २५० रुपये आणि वरच्या किंवा व्यावसायिक श्रेणीच्या डेकसाठी ३५० रुपये असेल.
 बेलापूर स्टेशनपासून ते बेलापूर जेट्टीसाठी शेअरिंग ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, गेटवे ऑफ इंडियावर, दक्षिण मुंबईतील विविध व्यावसायिक भागांत प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी शेअरिंग टॅक्सी तसेच बस सेवा उपलब्ध असल्याचे कंपनीने  म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post