दिवा/आरती मुळीक परब : कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिव्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून दिव्यांगांना धान्य वाटप करण्यात आले.
दिव्यातील बाळासाहेबांची शिवसेना शाखा, मुंब्रा देवी कॉलनीच्या वतीने आज संध्याकाळी गरजू अपंग बांधवांना माजी. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा देवी कॉलनी विभाग प्रमुख विनोद मढवी आणि दिवा शहर युवती अधिकारी, साक्षी मढवी यांनी संयुक्तरित्या धान्य वाटप केले. तसेच शाखा प्रमुख गणेश गायकवाड, तर राहूल गायकर, नितीन घेवडे, बिपीन पटवा, प्रशांत आपकर, नरेश शेलार, निलेश पारकर, सत्शील सावंत, संतोष मोरे या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली.