दिवा \ आरती परब : शिवसेना उपशहरप्रमुख व लोकप्रिय माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनीतील शाखेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. दरवर्षी शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
या रक्तदान शिबिराला स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित राहून रक्तदान ही केले. तसेच या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक केले. रिलायन्स टॉवर शिवसेना शाखा येथे भरलेल्या या रक्तदान शिबिरात १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. "थेंब थेंब रक्ताचा, उपक्रम समाजसेवेचा" या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या शिबिरासाठी ब्लड लाईन, चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हरदेव हॉस्पिटल, दिवाचे रुग्ण सेवक शेखर हेमंत देशमुख हेही उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन कैलास मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रदीप पाटील (शाखा प्रमुख), सुरेश जगताप, भरत मोहिते, जगदीश कदम, संतोष तांबे, मनोहर सकपाळ, अमोल रेडेकर, आदित्य कदम, रुपेश लाड, अनिल विश्वकर्मा, सुदेश चव्हाण, उमेश पवार, सुरज पगारे, रामजी जयस्वाल, आशिष सिंग, राहुल जयस्वाल, शाम सोनावणे, अशोक नरे, मारुती सावंत, राजेंद्र कांबळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी माऊली मोहिते व किरण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असून, शैलेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये समाजसेवेचा संदेश पसरला.