डोंबिवली/ शंकर जाधव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ईगल ब्रिगेड फाउंडेशन डोंबिवली यांच्या संकल्पनेतून हेवेन स्कूल, डोंबिवली येथील दिव्यांग मुलांना खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. मुलांनी या खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर हे उपस्थीत होते. हेवेन स्कूलचे संचालिका स्मिता कीर्तने यांनी या उपक्रमास सहकार्य केले.