मुंबई: शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर ही पक्षाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कफ परेड येथील ताज रेसिडंट हाॅटेलमध्ये पार पडली. या कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते पदी निवड करण्यात आली. सिद्धेश रामदास कदम हे शिवसेनेचे सचिव असतील. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली.
आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असतील. ही त्रिसदस्यीय समिती असेल.