डोंबिवली ते माणकोली पूल लवकरच सुरू होणार

 पुलाचे काम पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

 डोंबिवली / शंकर जाधव :  २०१४ पासून सुरू असलेले दोन डोंबिवली ते माणकोली पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे.या पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल अशी माहिती स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पाहणी दौरा करताना सांगितले.पूल सुरू झाल्यानंतर नागरिकांना रेल्वेशिवाय वाहतूकीचा अतिरिक्त पर्याय मिळणार आहे.

    बुधवारी माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांबरोबर डोंबिवली ते माणकोली पुलाची पाहणी केली. त्यावेळी म्हात्रे म्हणाले, कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे पर्यतचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रासदायक ठरतो. मात्र डोंबिवली ते माणकोली पुलामुळे नागरिकांचा त्रास दूर होणार आहे. मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी याप्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीवरून ठाणेदरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि प पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता प्रास्ताविक कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमो होईल.



Post a Comment

Previous Post Next Post