२६३ कोटी ४५ लाखांचे वितरण लवकरच होणार
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे २६३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर सर्व पात्र घटकांसाठी लागणारा संपूर्ण निधी राज्य सरकार पुरवते. वितरणाचा निधी सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. विभागाकडे निधी मिळाल्यानंतर साधारण एक ते दोन दिवसांच्या आत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हप्ता जमा केला जातो.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या पुढील ४८ तासांत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरु होऊन ११ किंवा १२ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.
- ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केले आहे, त्या लाभार्थींना १७ वा हप्ता (१५०० रुपये) सर्वप्रथम जमा केला जाईल.
- ज्या महिलांची ई-KYC अद्याप पूर्ण नाही, त्यांनाही नोव्हेंबर महिन्याचा (१७ वा) हप्ता १५००रुपये जमा केला जाईल.
ज्या महिलांनी ई-KYC अजून पूर्ण केलेले नाही, त्यांनी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत म्हणून KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-KYC न केलेल्या लाभार्थींना १८वा हप्ता मिळणार नाही, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नोव्हेंबर हप्त्याची विशिष्ट तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
