डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील 90 फिट रस्त्याच्या कडेला बिनदास्तपणे प्रेमाचा रंग उधळणाऱ्या बजरंग दलाने चांगलाच दणका दिला.सार्वजनिक ठिकाणचे भान न ठेवता या जागेत प्रेमी युगलांचे चाळे पाहून परिसरातील नागरिक प्रचंड संतापले होते.रात्री आठ नंतर तर या ठिकाणी सामान्य नागरिक चालू ही शकत नाही अश्या प्रकारे प्रेमी युगल बसलेले असतात.
नागरिकांच्या तक्रारी वारंवार आल्याने अखेर 14 फेब्रेवारीला सायंकाळी बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक करण उल्लेंगल यांसह कार्यकर्त्यानी प्रेमी युगलांना इशारा देऊन या ठिकाणाहून हाकलवून दिले.आता फक्त इशारा दिला आहे, पुन्हा या ठिकाणी प्रेमी युगलांनी सार्वजनिक ठिकाणचे भान ठेवले नाही तर दणका दिला जाईल असा इशारा बजरंग दलाने दिला.