मुंबई : ठाणे पश्चिमेकडील अंबिका नगर २ मध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती मंगळवारी सकाळी विविध संस्था संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, भिमराज मित्र मंडळ आणि प्रज्ञा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने विभागात जयंती साजरी केली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात अमूल्य स्थान असणाऱ्या त्यांच्या अर्धागिनी माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माता रमाई यांची १२५ वी जयंती अंबिका नगर २ मध्ये साजरी करण्यात आली. भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दला तर्फे विभागात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर भिमराज मित्र मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रज्ञा फाऊंडेशन तर्फे रमाई च्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा ठाणे शहर अध्यक्ष मेजर वसंत मोरे गुरुजी, ठाणे तालुका सचिव सैनिक नामदेव झिने गुरुजी अंबिका नगर शाखा कोषाध्यक्ष पप्पू गायकवाड गुरुजी , सैनिक भगवान आठवले गुरजी, वंचित बहुजन आघाडी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र आंभोरे ,महासचिव मोहन नाईक तसेच प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे,बाबासाहेब साबळे, भिमराज मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश जाधव,संतोष मोरे,विक्रांत मोरे सह विभागातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.