- विरोधकांच्या तुमच्या पदरी निराशाच येणार
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा संजय राऊत यांना टोला
डोंबिवली / शंकर जाधव : महाविकास आघाडीच्या पदरी निराशाच येणार असून सध्याचे सरकार हे मजबूत असून हे राज्य सरकार पूर्ण मजबुतीने उभं राहणार आहे, राज्याचा विकास हेच सरकार करेल यात संदेह नाही असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लगावला.डोंबिवलीतील रोटरी भवन येथे कल्याण लोकसभा पक्षीय आढावा घेण्यासाठी आले होते.
यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार प्रवीण दरेकर, संजय केळकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, कुमार आयलानी, सचिव गुलाब करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब,मितेश पेणकर, मिहीर देसाई, संजीव बिरवाडकर, महिला पदाधिकारी पूनम पाटील, मनीषा छच्चारे,वर्षा परमार, दिवा पदाधिकारी रोहिदास मुंडे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप- बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युती मजबूत असून हे सरकार पूर्ण मजबुतीने उभे राहील.विरोधी पक्षाच्या हाती निराशाच लागेल.