शिवजयंतीनिमित्त दिव्यात मोटारसायकल रॅली

 

सचिन भोईर यांच्या श्री समर्थ मित्र मंडळाचा उपक्रम 



दिवा / आरती मुळीक परब:   सचिन भोईर यांच्या श्री समर्थ मित्र मंडळच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दिव्यात रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सचिन भोईर व निलेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मोटार सायकल रॅलीत सुमारे 300 ते 500 बाईकस्वार सहभागी झाले होते. दिवा शहरात बाईक रॅली काढत शिवाजी महाराजांचा जयघोष करत, झेंडे फडकवत महाराजांना मानवंदना सर्वांनी दिल्या. यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.




--

Post a Comment

Previous Post Next Post