दिवा / आरती मुळीक परब: छत्रपति शिवाजी महाराज सार्वजनिक शिवज्योत उत्सव, दिवा शहर या सार्वजनिक मंडळाच्या वतीने रविवार दि १९ फेब्रु २०२३रोजी शिवजन्मोत्सव निमित्ताने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या आगळया वेगळ्या संकल्पनेतून महाराजांचे विचार घराघरात पोचविण्यासाठी किल्ले शिवनेरी ते दिवा शहर 100 ते 150 शिवभक्तानी पायी चालत शिवज्योत घेऊन येऊन दिवा शहरातील मंडळांना भेटी देऊन शिवगर्जना करून बेडेकर नगर येथून सकाळी १० वाजता नगरप्रदक्षिणेला शिवज्योतीसह शोभायात्रेला आरंभ झाला. मावळ ढोलपथकाच्या झांजाच्या गजरात शिवप्रतीमेच्या पालखीला सुरवात झाली, लेझिम पथक, पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक महिला भगिनी, बालकलाकार यांनी सहभाग नोंदवला, भव्यदिव्य शोभायात्रे मध्ये अनेक सामाजिक,राजकीय मान्यवर, महिला बचत, महिला मंडळ, रहिवाशी संघटना, अनेक शाळेतील विद्यार्थी, क्लासेसचे विद्यार्थी, जिल्हा रहिवाशी संघटना तसेच भूमिपुत्र बांधवासह, सर्व शिवभक्त व बहुजन बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला, पालखीचे व शिवज्योतीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले, अनेक दानशूर मंडळानी व व्यक्तींनी शोभायात्रेमध्ये ठिकठिकानी पाणी सरबत, अल्पोपहार दिला, सामाजिक संदेश आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेमध्ये अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख उपमहापौर रमाकांत मढवी, ऐरोली विधानसभा विभागप्रमुख चंद्रकांत चाळके, भाजपचे नरेश पवार, रेश्मा पवार, चरण म्हात्रे, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, नगरसेवक दीपक जाधव, जागा हो दिवेकरचे विजय भोईर, उमेश भगत, गणेश भगत,ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, सपना भगत, रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद भगत, समाजसेेवक नवनीत पाटिल, गुरुनाथ नाईक, मनसेचे शहर प्रमुख तुषार पाटील, समीर चव्हाण, वंचितचे मिलिंद गवई, समाजसेवक अमोल केंद्रे, आश्विनी केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेची सांगता विठ्ठल मंदीर, दातिवली रोड येथे करण्यात आली. नंदू केणी व आनंद केनी यांनी विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत केले, विशेष आभार शिवज्योत टीम, सद्धिविनायक हॉस्पीटल, भजनी मंडळ, लेझीम पथक, मावळ ढोल पथक, तुतारी वाले, घोडेवाले, श्री जोतिबा मंदीर घाटकोपर, फोटोग्राफर,पत्रकार मीडिया आरती परब ,किरण कुडवे, मुंब्रा. पो. स्टेशन दिवा चौकीचे एपीआय शेळके, किंगरे यांची टीम व हा सोहळा पार पाडण्यासाठी शिवभक्त कार्यकारणी टीमने अहोरात्र मेहनत घेतली.