जळगाव : जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवल यांना रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे ‘रोटरी साईन्स लीडरशिप अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुण, प्रशासकीय कार्यक्षमता, सेवाभावना आणि समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत हा सन्मान देण्यात येणार आहे.
मीनल करणवल यांनी जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना नाविन्यपूर्ण प्रशासकीय उपक्रम राबवले. पारदर्शक कारभार, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, ग्रामीण विकास तसेच लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक व प्रशासकीय योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ जळगावच्या व्यावसायिक महिला उपक्रमांतर्गत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी गणपती नगर, जळगाव येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभास सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगावचे अध्यक्ष रोटेरियन गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे
.jpeg)