केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा कल्याण दौर्‍यावर

 कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपचे लक्ष 

 डोंबिवली / शंकर जाधव : लोकसभा मतदार संघात भाजप सक्षम करणे हा उद्देश समोर ठेवून भाजपने आतापासूनच तुयारी सुरू केल्याचे दिसते.गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण- डोंबिवली शहराचा दौरा केला होता.आता पुन्हा १४ तारखेला मंत्री ठाकूर दौरा करणार आहेत.दौऱ्याबाबत माहिती देताना  आमदार संजय केळकर यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीत लोकसभा लढवली जाणार असून उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असे केळकर यांनी सांगितले.विशेष म्हणजे भाजपने महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून यात कल्याण लोकसभा मतदार संघही असल्याचे त्यांनी सांगितले.

   आमदार संजय केळकर यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण- डोंबिवली शहराचा एक दिवसीय दौऱ्याबाबत माहिती दिली.१४ तारखेला सकाळपासून कळवा,मुंब्रा ,कल्याण डोंबिवली शहराचा दौरा सूरु होईल.दुपारी मंत्री ठाकूर हे डोंबिवलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.दुपारी 4 नंतर रोटरी भवन येथे  पत्रकार परिषद घेतली जाईल.आजवर कल्याण लोकसभा मतदार संघावर शिवसेनाचा दावा असताना भाजप कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजप लक्ष केंद्रित करत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता केळकर म्हणाले, पक्षश्रेष्टी जे ठरवतील ते काम कार्यकर्ते करत असतात. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीनुसार  पक्ष निर्णय घेतील.यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बुलेट ट्रेनला वंदे मातरम असे नाव द्यावे अशी मागणी केली असल्याचे आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितले. बुलेट ट्रेनला वंदे मातरम नाव दिल्याने ते देशाला जोडले जाईल असे केळकर म्हणाले.





Post a Comment

Previous Post Next Post