आई- वडिलांनी मानले आभार
डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील कारवा रुग्णालयाच्या जवळील एका इमारतीत राहणाऱ्या प्रसाद त्रिंबक्कर यांचा गतिमंद मुलगा प्रथमेश हा घराबाहेर पडून रस्त्यावर फिरत होता.या मुलाला पाहून नागरिक चर्चा करत असताना भाजप सोशल मीडिया सेलचे डोंबिवली प्रमुख गणेश येशी आणि भाजप प्रभाग क्र.६९ शिवमार्केट वाँड उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पाहिले. गणेश आणि संतोष यांनी माहिती माजी नगरसेवक विश्वदिप पवार यांना दिली असता पवार यांच्या सुचनेनुसार मुलाला आई वडिलांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सूरु झाले. प्रयत्नांना यश आले आणि मायलेकरांची भेट झाली. आईवडिलांनी माजी नगरसेवक पवार आणि दोघा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
प्रसाद त्रिंबक्कर यांच्या मुलगा प्रथेमश रस्तावर फिरत असताना त्याला काहीही समजत नव्हते.भाजप सोशल मीडिया सेलचे डोंबिवली प्रमुख येशी आणि भाजप प्रभाग क्र.६९ शिवमार्केट वाँड उपाध्यक्ष चव्हाण यांनी मुलाला पाहिले असता त्याला माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या कार्यालयात आणले.कार्यालयात प्रथेमशला खाऊ दिल्यानंतर त्याची माहिती येशी यांनी सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकली.याच परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने ग्रुपवरील मुलाचा फोटो पहिला असता हा मुलगा आपल्याच इमारतीत राहत असल्याचे येशी व चव्हाण यांना सांगताच त्यांनी प्रथमेशच्या आईवडिलांना संपर्क साधून माहिती दिली.प्रथेमशला घेऊन येशी आणि चव्हाण हे त्याच्या घरी गेले.प्रथमेशला पाहून आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले.त्यानंतर गणेश येशी यांनी माजी नगरसेवक पवार यांना मोबाईल वरून कॉल करून प्रथेमशच्या आई वडिलांशी बोलणे करून दिले.त्यावेळी आईवडिलांनी माजी नगरसेवक विश्वदिप पवार व भाजप पदाधिकारी गणेश येशी आणि संतोष चव्हाण यांचे आभार मानले.मदत हवी असल्यास अथवा कोणतीही अडचण असल्यास माझ्या कार्यलयाशी संपर्क साधा असे पवार यांनी प्रथेमशच्या आई वडिलांना सांगितले.