अ‍ॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्सचे मुंबईत आयोजन

 

मुंबई,(प्रतिनिधी): लुपिन लाइफ लुपिनच्या कंझ्युमर हेल्थकेअर डिव्हिजनने रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात मुलांच्या आरोग्यदायी भविष्याला चालना देण्यासाठी पहिली-वहिली अ‍ॅप्टिव्हेट चॅम्पियन रन आयोजित केली होती. अ‍ॅप्टिव्हेट चॅम्पियन रन हा मुलांसाठी आणि पालकांसाठी एक उत्साहवर्धक कार्यक्रम होता. यात ३००० हून अधिक मुंबईकरांनी सहभाग नोंदवला आणि शारीरिक आरोग्य आणि चांगली भूक यांच्याद्वारे मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण केली. या रनमध्ये अभिनेत्री नेहा धूपिया हिने सहभाग घेऊन रनला हिरवा झेंडा दाखविला.

       अ‍ॅप्टिव्हेट चॅम्पियन रनमध्ये मुलांसाठी धावण्याच्या तीन श्रेणी करण्यात आल्या होत्या ज्यात ४-७ वर्षे वयोगटासाठी ५०० मीटर धावणे, ८-१० वर्षे वयोगटासाठी १.५ किलोमीटर धावणे आणि ११-१३ वर्षे वयोगटासाठी २.५ किलोमीटर वेळेवर धावणे यांचा समावेश होता. धावण्या आधी फिटनेस तज्ञांद्वारे सखोल प्रशिक्षण-सह-प्रीप-अप सत्राने मुलांना प्री-वॉर्म अप आणि कूल डाउन व्यायामाची ओळख करून दिली आणि त्यांच्या धावण्याच्या आधी आणि नंतर काय करावे  तसेच दुखापती टाळण्यासाठी आणि धावण्याच्या दरम्यान तग धरण्याची क्षमता राखण्यासाठी आवश्यक गोष्टी याविषयी माहिती देण्यात आली. रननंतर मुलांसाठी ट्रॅम्पोलिन, बाऊन्सी कॅसल, टॉय ट्रेन्स, झुंबा सेशन्स, मुलांचे खेळ  यासह त्यांचा सहभाग गुंतवून ठेवण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी इतर अनेक रोमांचक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post