24 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार

 


        प.पू.स्वामी श्री. गोविंददेव गीरीजी महाराज

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीत मी यावं आणि श्री गणपती च्या त्या उपक्रमात सहभागी व्हावे असा मला आग्रह होता.योगायोगाने दोन ते तीन कार्यक्रम डोंबिवली त असल्याने मला येण सुकर झाले.अयोध्येच्या राम मंदिराच्या कार्यामुळे मला फार कमी वेळ मिळतो म्हणून मला तीन ही कार्यक्रम एकत्र असल्याने डोंबिवली त येत शक्य झाले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.जानेवारी 24 तारखेला अयोध्येला राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होईल आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 

मंदिरात मुख्य गाभारा,पहिला मजला आणि दर्शनाची व्यवस्था इतकं सगळं होईल आणि भगवंताचे नवीन भव्यदिव्य मंदिरात आगमन होईल.भगवान राम लल्ला ना त्यांच्या मुळ स्थानी विराजमान करावं हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला हवे आहे.कारण भगवान राम लल्ला यांनी पुष्कळ दिवस कपड्यांच्या मंडपात काढले आता तात्पुरत्या छोट्याशा मंदिरात आहेत.

आमची तळमळ ही आहे की लवकर भगवंतांनी त्यांच्या स्थानी विराजमान व्हावे असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या कोषाध्यक्ष प.पू.स्वामी श्री. गोविंददेव गीरीजी महाराज यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील ,एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ.मिलिंद शिरोडकर , भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच विनय भोळे यांनी निवेदन केले तर सुत्रसंचालनाची जबाबदारी अनिकेत घमंडी यांनी सांभाळली.



Post a Comment

Previous Post Next Post