डोंबिवली / शंकर जाधव : ज्येष्ठ शिवसैनिक आणि डोंबिवली एमआयडीसी शिवसेना शाखेचे माजी कार्यालय प्रमुख, शिवप्रतिमा मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य/माजी कार्याध्यक्ष रमेश भालचंद्र स्वर्गे यांचे आज शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने वयाचा ८६ वर्षी निधन झाले आहे.रमेश स्वर्गे हे तरुण वयापासून कट्टर शिवसैनिक होते. एमआयडीसी निवासी भागात शिवसेना वाढीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. केडीएमसी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सुरवातीपासून आजतागायत एमआयडीसी प्रभागात शिवसेना विजयी होत होती. त्याचे बरेचशे श्रेय त्यांना जाते. कामाची आखणी, नियोजन, मतदार याद्यांच्या अभ्यास अशा सर्व बाबतीत त्यांचा सल्ला मोलाचा असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे.