अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची धडक कारवाई सुरू




 महापालिकेच्या सर्व विभागातील एकूण २१७ जोडण्या तोडल्या 

 एकूण १४  नळजोडणींधारकांवर गुन्हे दाखल 

डोंबिवली / शंकर जाधव :  महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागांत शुक्रवारी अनाधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची धडक मोहिम राबविण्यात आली.

या कारवाईत कल्याण पूर्व व पश्चिम विभागातील १/अ, २/ब, ३/क, ४/जे व ५/ड प्रभागात एकूण ९० नळजोडण्या (११ व्यावसायिक आणि ७९ घरगुती) खंडीत करण्यात आल्या. सदर कारवाई पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांच्या अधिपत्याखाली "१/अ, २/ब, ३/क, ४/जे व ५/ड प्रभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रभागांचे सहा.आयुक्त, प्लंबर व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

    डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागातील ६/फ, ७/ह, ८/ग, ९/आय व १०/ई या प्रभागात‍ एकूण १२७ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये आयरे गावातील चाळ परिसरातील 21 नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या,तसेच

 कोपर आयरे रेल्वे पुलाखालील 57 नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. ९/आय प्रभागात एकूण १४ वाणिज्य अनधिकृत नळ जोडणी धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्या अधिपत्त्याखाली ६/फ, ७/ह, ८/ग", ९/आय व १०/ई प्रभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रभागांचे सहा.आयुक्त, प्लंबर व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.याबाबत महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर कार्यवाही यापुढेही सुरु राहणार असल्याची‍ माहिती पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post