तब्बल दोन वर्षांनी बदल्या
राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई
डोंबिवली/शंकर जाधव : फेरीवाला अतिक्रमण हा विषय गंभीर बनत असताना तब्बल दोन वर्षांनी फेरीवाला हटाव पथक आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकातील चतुर्थ श्रेतीतील १५९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.यापूर्वी १८ मार्च रोजी २०२१ रोजी २२१ कर्मचाऱ्यांचा बदल्या होत्या. नुकत्याच करण्यात आलेल्या बदली बाबत राजकीय दबाव आणल्यास संबधितांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) १७७९ च्या नियम २ नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे आदेशात म्हटले आहे.
शुक्रवारी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या बदलीच्या आदेशाने कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कल्याण मुख्यालयात गेल्याने बदलीचे आदेश काढण्यात आल्याचे बोलले जाते आहे. फेरीवाला प्रश्न सोडविण्यास पथक कमी पडत असल्याने यावर बदली हा मार्ग प्रशासनाकडून काढण्यात आला.स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाल्यांना मोकळे रान मिळत होते. डोंबिवलीतील `ग`, `फ` `ह` व `इ`प्रभाग क्षेत्रातील फेरीवां हटाव पथकातील कर्मचारी कल्याण येथील `अ``,ड`,`जे`,`ब` व `आय` प्रभागात बदली करण्यात आली. बदलीचे आदेश काढण्यानंतर बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त होऊन त्यांनी तत्काळ हजर होऊन तसा अहवाल सामान्य प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे.जे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाही अशा कर्मचाऱ्यांचे आगामी महिन्यातील मासिक वेतन संबधित अस्थापना विभागाने अदा करू नये असे स्पष्टपणे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदलीबाबत काही कर्मचारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
.jpeg)