तोतया पोलिसाला कोळसेवाडी पोलिसांनी केले जेरबंद

 



डोंबिवली / शंकर जाधव : दुचाकी चोरणाऱ्या तोतया पोलिसाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून जेरबंद केले आहे. दुचाकीच्या मालकाला कागदपत्रा तपासणीच्या बहाण्याने दुचाकी घेऊन पसार झाला होता.तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

 मिळालेल्या माहितीनुसार , दिलीप शांताराम पाटील असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. दिलीप जळगावात ट्राफिक वॉर्डनचे काम करायचा. त्याच्यावर ठाणे शहर पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे प्रशासन पोलीस उपनिरीक्षक ( प्रशासन ) चंद्रशेखर कदम यांनी सांगितले.

दिलीप याने पत्री पूल येथील चौकीजवळ एका फेरीवाल्याच्या दुचाकाची कागद तपासणी साठी त्याला थांबवून , त्याच्या कडे पैशांची मागणी करून,पैसे दिले नाहीत म्हणून तुझी दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करतो सांगून त्याची दुचाकी घेऊन पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे ,दिनकर पगारे यासह कर्मचाऱ्यांनी दिलीपला मूळचा राहणार टिटवी, तालुका पारोळा, चिंचपाडा गावातून जिल्हा जळगाव येथून अटक केली.दिलीपकडून पोलिसांनी दुचाकी हस्तगत केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post