स्मारकाच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेबांचे विचार सगळीकडे पसरले पाहीजे !


नवी मुंबई / संकेत शिरसाठ : नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी शहारासोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पर्यटक स्मारकाला भेट देत आहेत. 

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करावे या उद्देशातून लाखो नागरिक या स्मारकाला भेट देत आहेत. डॉ.  बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्राच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्य़ातील धरणगाव येथील कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी संकेत शिरसाठ तसेच मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकारी जगन्नाथ ब्राम्हणे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक पाहून भारावून गेले. तसेच भारतातील प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी या स्मारकास भेट देऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी म्हटले. 

स्मारकामध्ये डाॅ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र मांडणारे दूर्मीळ छायाचित्र दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, आभासी चलचित्र प्रणालीव्दारे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकूलीत प्रशस्त सभागृह अशा विविध सुविधा पाहून विविध स्तरांतील नागरिकांनी स्मारक पाहून धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.

डाॅ. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक म्हणून पेनच्या निबच्या आकारातील स्मारकाचा लांबूनच नजरेत भरणारा 50 मीटर उंचीचा भव्य डोम स्मारकाबद्दलचे आकर्षण वाढवतो आणि स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची अलौकिक अनुभूती जाणवते असेही अभिप्राय अनेकांनी नोंदविले.



Post a Comment

Previous Post Next Post