शोभायात्रेनिमित्त आयोजित चित्ररंगभरण स्पर्धेत ४५०० मुलांचा सहभाग

 

शोभायात्रेनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत ४५ शाळांचा सहभाग

डोंबिवली, शंकर जाधव : श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने यंदाच्या रौप्य महोत्सवी शोभायात्रेच्या निमित्ताने डोंबिवलीतील विविध शाळांमधून निबंध स्पर्धा आणि चित्ररंगभरण स्पर्धा घेण्यात आली. त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

‘माझी डोंबिवली, स्वच्छ डोंबिवली’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यात ४५ शाळांमधून मराठी व इंग्रजी माध्यमाच्या १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच चित्ररंगभरण स्पर्धेसाठी ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले. निबंध स्पर्धेसाठी उमा आवटे-पुजारी, निधी केतन, तर चित्ररंगभरण स्पर्धेचे परीक्षण उमेश पांचाळ, भक्ती भागवत यांनी केले. 

 निकाल पुढीलप्रमाणे : 

निबंध स्पर्धा

प्रथम क्रमांक

१. भाविका खटाव (ओंकार इंग्लिश)

२. गौरव आहेर (ग्रीन इंग्लिश)

द्वितीय क्रमांक

१. अवंती केतकर (विद्या निकेतन)

२. सौजन्या कृष्णमूर्ती (डाॅनबाॅस्को)

तृतीय क्रमांक 

१. स्वरा देसाई (विद्या निकेतन)

२. पार्थ निस्ताने (विद्या निकेतन)

उत्तेजनार्थ 

१. स्वरा म्हादोळकर (ओंकार इंग्लिश)

२. वियांशी जोशी (ग्रीन इंग्लिश)

३. प्रिया चौधरी (ज्ञानमंदिर)

४. ऋग्वेद नरकडे (पाटकर हायस्कूल)

चित्ररंगभरण स्पर्धा

प्रथम क्रमांक :

१. अनन्या यादव (सेंटमेरी)

२. संस्कृती निपाने (ओंकार स्कूल)

द्वितीय क्रमांक 8

१. मोहक बेंदळे (ओंकार सीबीएससी)

२. यश देवधर (पाटकर हायस्कूल)

तृतीय क्रमांक 

१. अनुश्री खोचरे (ओंकार स्कूल)

२. आनंदी पेंतपिल्लई (ओंकार स्कूल)

  उत्तेजनार्थ

१. अनुज्ञा पानसरे (ओंकार स्कूल)

२. आरूषी गुप्ता (सेंट झेवियर्स)

३. दर्शन कुबल (जनगणमन)

४. अबिगेल जॅकोब (ओंकार स्कूल)






Post a Comment

Previous Post Next Post