डॉ.शुभदा खटावकर यांचा महिला वर्गाला संदेश
डोंबिवली / शंकर जाधव : स्त्री ही सक्षम जरी असली तिने जगात काय चाललंय याची माहिती घेणे आवश्यक आहे. स्त्रियांनी वाचन वाढवून ही माहिती घेतली पाहिजे. केवळ एक दिवस महिला दिन साजरा न करता सर्वच दिवस महिलांचे आहे असे समजावे असे डॉ.शुभदा खटावकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.शुभदा खटावकर यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या कन्या रत्न पुरस्कार सोहळ्यात उपस्थित महिला वर्गाला संदेश दिला.
डोंबिवली पूर्वेकडील श्री राधाबाई साठे विद्यालयात आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली श्री राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय डोंबिवलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लेक लाडकी अभियान २०२३ कन्यारत्न पुरस्कार सोहळा पडला. या सोहळ्यात कन्यारत्न असलेल्या महिला पालकांचा त्याच्या पाल्यासह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. शुभदा खटावकर यांनी भूषविले होते. प्रमुख अतिथी म्हणून समुपदेशक सुनीता घमंडी, लेखक डॉ. योगेश जोशी आणि संचालिका खर्डीकर, सक्षम नारी जनरल कामगार संघटना संस्थपिका स्वाती मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.खटावकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्त्री ही आर्थिक, शैक्षणिक, शारीरिक सक्षम असली पाहिजे असे सांगितले.
पुढे प्रमुख अतिथी म्हणून समुपदेशक सुनीता घमंडी यांनी तरुणींना मार्गदर्शन करताना तरुणींनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. याची थोडक्यात माहिती दिली. लेखक डॉ. योगेश जोशी यांनी प्रत्येक पुढीला क्रांती हवी असून विचारात बदल ही सुद्धा क्रांतीच आहे असे संगीतले. स्वाती मोहिते म्हणाल्या, स्त्री म्हणजे पूर्ण असून तिच्याशिवाय जग अपूर्ण आहे. यावेळी हेमंत नेहते यांनी आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेने ज्यांना कन्या आहेत अशा ६५०० महिला पालकांना कन्या रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविले आहेत. यावेळी सुजाता घैसास खेमचंद पाटील आणि डॉ. सुनील खर्डीकर उपस्थित होते.