डोंबिवली / शंकर जाधव : हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना आता कर्जातून बाहेर पडण्याचा हिरवा सिंग्नल मिळाला आहे. म्हात्रे कर्जबाजारी रिक्षाचालकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून त्यात त्यांचे बँक खातेही शून्य बॅलन्सने सुरू केले जाणार आहे. ही संधी फक्त डोंबिवली शहरातच नव्हे तर कल्याण, अंबरनाथ, बदलापूर शहरातील रिक्षाचालकांना ही संधी मिळाली आहे.
स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे युवा सेना कार्यकारणी सदस्य दिपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आशु सिंह व युवराज पाटील यांच्यावतीने व रिक्षा चालक मालक युनियन डोंबिवली शहराच्या पुढाकाराने मोटो फिट्स गेट एॅडव्हटाईसतर्फे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर रिक्षाचालकांना वाहन उपलब्ध करून दिल्याबद्दल दर महिना दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यांचे बँक खातेही शून्य बॅलन्सने सुरू केले जाईल. तसेच रिक्षाचालकांचा इन्शुरन्स काढण्यात येणार आहे.तसेच झॅगल कंपनीच्या कुपने शॉपिंग करू शकतात.यावेळी महाराष्ट्र महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्यावतीने लक्ष्मण मिसाळ यांनी म्हात्रे यांचा सदर ठिकाणी वाढदिवस साजरा केला.
यावेळी रिक्षा चालक मालक युनियन डोंबिवली शहर उपाध्यक्ष अर्जुन माने, महेंद्र सोरटे, सुभाष चौधरी, लक्ष्मण यादव,राहुल पाटील, जगन सोनावणे, जयदास मोरे, बाळू मोरे, अभिजित सुर्व, चुडामण शेलार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रिक्षाचालकांच्या डोळ्याचीमोफत तपासणी करण्यात आली.