डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली एमआयडीसी मधील हेवन दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. सामान्य मुलांप्रमाणे या मुलांनी या उस्तवात सहभागी होऊन मजा केली. यावेळी शाळेच्या संचालिका स्मिता संजय कीर्तने आणि इतर शिक्षिकांनी सहभाग घेऊन मुलांना उत्साहित केले. या प्रकारे इतरही सण या शाळेत साजरे केले जातात त्यामुळे पालक वर्गही खूप आनंदी असल्याचे विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.