कल्याण: कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र व मोहिली उदंचन केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरूस्तीचे काम करावयाचे आहे. तरी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून होत असलेला पाणी पुरवठा मंगळवार दिनांक १४/०३/२०२३रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व पश्चिम/ ग्रामीण व डोंबिली पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.तरी सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी पालिकेकडून विनंती करण्यात आली आहे.
Tags
महाराष्ट्र
