शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या "त्या" देखाव्याची डोंबिवलीत चर्चा

 


350 वर्षानंतर पुन्हा तोच योग

डोंबिवली/ शंकर जाधव :  कल्याण - डोंबिवलीत शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर यंदा प्रथमच शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाकडून दोन वेगवेगळ्या मिरवणुका निघणार आहेत. शिवजयंती निमित्त चौका चौकात आकर्षक असे देखावे सादर करण्यात आलेत.         शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली शहर शाखेसमोर साकारण्यात आलेला देखावा सध्या डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. एका बाजूला भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबान सुपूर्द करतानाचा हा देखावा साकारण्यात आलाय. 350 वर्षानंतर पुन्हा तोच योग या आशयाखाली हा देखावा सादर करण्यात आला आहे. हा देखावा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून हा देखावा सध्या डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे.






Post a Comment

Previous Post Next Post