डोंबिवली / शंकर जाधव : केंद्रातील भाजप सरकार विरोधात डोंबिवली पश्चिमेला महात्मा गांधी उद्यानात आम आदमी पार्टीने आंदोलन केले.आंदोलन करताना कार्यकर्त्यानी भाजप सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.
दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य, मोफत वीज, पाणी व महिलांना प्रवास देण्याचे कार्य करणारे एकमेव सरकार म्हणजे अरविंद केजरवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचे सरकार आले देश-विदेशात आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारची स्तुती होत आहे. दिल्ली सरकारच्या चांगल्या कामाची तुलना भाजप शासित राज्यांच्या सरकारशी होत आहे.
केजरीवाल यांनी विचारलेल्या कठीण प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या भाजप सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय)ने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले. वेळ प्रसंगी केजरीवालांना तुरुंगात टाकून भाजप
कडून दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार बरखास्त केले जाऊ शकते.त्यामुळे भाजप सरकार चा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Tags
महाराष्ट्र
