ठाणे: श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने ९८ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७० व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी वैयक्तिक संघाची स्पर्धा सोमवार दिनांक १७-०४-२०२३ ते शुक्रवार दिनांक २१-०४-२०२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व सभासद व खेळाडू अतोनात मेहनत घेत आहेत.
स्पर्धेचे उदघाटन सोमवार दिनांक १७/०४/२०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजता श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगर पालिका) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या वेळी विशेष अतिथी म्हणून रघुनंदन गोखले (माजी अध्यक्ष महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना) हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ व समारोप शुक्रवार दिनांक २१/०४/२०२३ रोजी रात्रौ ९:०० वाजता पांडुरंग चाटे (प्रादेशिक निर्देशक भारतीय खेल प्राधिकरण, आय आर एस ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. अरुण सावंत (माजी प्र-कुलगुरू मुंबई विद्यापीठ, माजी प्र-कुलगुरू राजस्थान विद्यापीठ) हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत पुरुष गटात ५९ संघानी व महिला गटात ३२ संघानी अशा एकूण ९१ संघानी भाग घेतला आहे. ह्यामध्ये पुरुष गटात गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, अमर हिंद मुंबई शहर, बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर, क्रीडा प्रभोधिनी नाशिक, आई अष्टभुजा कबड्डी संघ पालघर, श्री राम कबड्डी संघ पालघर, टागोर नगर मित्र मंडळ मुंबई उपनगर, ग्रिफिन जिमखाना नवी मुंबई, अरुण क्रीडा मंडळ ठाणे, श्री समर्थ क्रीडा मंडळ ठाणे ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. महिला गटात शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर, स्नेहविकास क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, मुंबई पोलीस महिला जिमखाना मुंबई शहर, ऋिषी वाल्मीकी महिला संघ वसई,शिवशक्ती क्रीडा मंडळ धुळे, स्फूर्ती सेवा मंडळ ठाणे, होतकरु मित्र मंडळ ठाणे ह्या नामवंत संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेत एकूण ₹ २,५०,०००/- ची बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. बक्षिसांची माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम विजेता : ₹ ४४,४४४/- व चषक
अंतिम उपविजेता : ₹ ३३,३३३/- व चषक
उप उपांत्य विजेता : ₹ ११,१११/- व चषक
स्पर्धेतील उत्कुष्ट खेळाडू : ₹ ५,०००/-
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू : ₹ ३,०००/-
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कड : ₹ ३,०००/-
प्रत्येक दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : ₹ १,०००/-
प्रत्येक दिवसाची उत्कुष्ट पक्कड : ₹ १,०००/-
या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण स्पोर्टवोट ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे.
.jpeg)