डोंबिवली / शंकर जाधव : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा सातवा वर्धापनदिनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या सुचनेनुसार डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील साधना वृद्धाश्रमात वृद्धांना फळे वाटप करण्यात आले.याप्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी मुंबई अध्यक्षा वर्षा भास्कर, युग फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कल्पना किरतकर यासह संस्थेच्या अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी संघटनेच्या महिला आघाडी मुंबई अध्यक्षा भास्कर म्हणाल्या,मला अत्यंत आनंद होत आहे की माझी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईस संघटनेच्या महिला आघाडी मुबंई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मी साधना आणि साई सेवा ह्या दोन्ही वृद्धाश्रमात जाऊन मी फळ वाटप केले.माझ्या सोबत युग फौंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरीतकर आणि मैत्रीत्व सामाजिक संस्था ॲड.प्रदीप बावस्कर हेही उपस्थित होते.
