संतापलेल्या दोघांचा रिक्षाचालकांवर चाकूने हल्ला
डोंबिवली / शंकर जाधव : दोन इसमांनी एका रिक्षाचालकला मारहाण करून चाकूने हल्ला करून जखमी केले.ही घटना बुधवारी १९ तारखेला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून दोघा हल्लेखोरांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम शेवाळे असे हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील इंदिरा चौकात सकाळच्या सव्वा सातच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी रिक्षाचालक शेवाळे यांच्या डोक्यावर टपली मारली.टपली मारण्याच्या जाब विचारण्यावरून रिक्षाचालक शेवाळे यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी धारधार चाकूने हल्ला चढविला.हल्लेखोरांनी घटनास्थळी पळ काढला असला तरी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.जखमी रिक्षा चालक शेवाळे यांन पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालक शेवाळे यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोरांवर रामनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 326 आणि 34 कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे तपास करत आहे.सहाय्याने त्या दोन आरोपीचा शोध रामनगर पोलीस सुरु केला आहे.
