डोंबिवली / शंकर जाधव : वाहतुकीमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांनी एका भल्या मोठ्या पाइपमधून वाट काढली. हे नेहमीचे दृश्य कल्याण - शिळ रोडवरील देसाई गावाजवळ नेहमी पाहायला मिळते.रस्त्याचे काम रखडल्याने येथे वाहतूक कोंडी होत असल्याने असे प्रकार घडतात.
कल्याण शीळ रस्त्याचे रखडलेले काम आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक पुरते वैतागले आहेत.रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी दुचाकीस्वारांनी शॉर्टकट काढला आहे.देसाई गावाजवळ वाहतूक कोंडीवर तोडगा काढत दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाईपमधून दुचाकी बाहेर काढतात. रस्त्यावरील वाहतुकीच्या उलट्या दिशेने या गाड्या बाहेर पडताना दिसतात. तर येथील वाहतुकीमुळे जवळील गावांना खूपच त्रास होत आहे.दरम्यान कमी वेळ आणि शॉर्टकट मार्ग अवलंबिल्याने वाहनचालकांचा सध्या तरी वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होताना दिसते.
