मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात ११५२ रुग्णांची तर ४ मृत्यूंची नोंद झली आहे. ९२० रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी किंचित वाढ होऊन २८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत एका मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १६४३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ६० हजार १०३ रुग्णांची तर १९ हजार ७५३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयात ११८ रुग्ण दाखल असून ४२ रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासली आहे.
बुधवारी ३२० रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात घट होऊन २७४ रुग्णांची नोंद झाली होती. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५४ हजार ५२९ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७५ मृत्यूची नोंद झाली आहे. ८० लाख १२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे ५९२८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १६४३, ठाणे १०५६, पुणे ७४७, नागपूर ७७९, रायगड २५४, पालघर १८३, सांगली १८०, सोलापूर १३३, उस्मानाबाद १३३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा. पालिका रुग्णालय आणि कार्यालयात मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpeg)