पंकज अडवानीची धमाकेदार सुरुवात

 


सीसीआय क्लासिक आमंत्रित बिलियर्ड्स स्पर्धा

मुंबई : भारताचा दिग्गज क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने १० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सीसीआय क्लासिक आमंत्रित बिलियर्ड्स स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली. ध्रुव सितवाला आणि ईशप्रीत सिंग चड्डानेही आपापल्या गटात विजयी सलामी दिली.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू झालेल्या टाइम फॉरमॅट बिलियर्ड्स स्पर्धेच्या अ गटातील लीग पहिल्या लीग सामन्यात शुक्रवारी २२ जागतिक जेतेपदे नावावर असलेल्या पंकजने सब-ज्युनियर बिलियर्ड्सचा दोन वेळा राष्ट्रीय विजेता, मुंबईचा शायन राझमी याला 1015-229 असे मोठया फरकाने पराभूत केले.

बेंगळुरूस्थित अडवानीने अनुभवाच्या जोरावर सुरेख खेळ करताना प्रतिस्पर्धी नवोदित शायन याला फारशी संधी दिली नाही. त्यामुळे स्नूकर चॅम्प दबावाखाली आला. अडवानीने 204, 155 आणि 169 अशा महत्त्वपूर्ण ब्रेकसह मोठ्या फरकाने पहिला सामना जिंकला.

अन्य बोर्डवर भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा बिलियर्ड्सपटू ध्रुव सितवाला यानेही विजयारंभ केला. टावखुर्‍या सितवाला याने ड गटात 101 गुणांचा ब्रेक घेत सुनील जैन याच्यावर 426-293 अशा फरकाने मात केली.

दरम्यान, ईशप्रीत सिंग चड्डानेही आश्वासक सुरुवात करताना आदित्य अग्रवाल याला 740-344 असे पराभूत केले. त्यात 91 आणि 92 अशा दोन ब्रेकचा समावेश आहे.

निकाल - ए ग्रुप: पंकज अडवाणी विजयी वि. शायन रझमी 1015(204,155,169)-299). लौकिक पठारे विजयी. वि. नलिन पटेल 613(165)-371;

डी ग्रुप: रोहन जंबुसारिया लिजयी वि. मेहुल सुतारिया 424-357; ध्रुव सितवाला विजयी वि. सुनील जैन 426(101)-293; ईशप्रीत सिंग बीटी आदित्य अग्रवाल 740(91,92)-344.

एफ ग्रुप: स्पर्श फेरवानी विजयी वि. सिद्धार्थ पारिख 402-386(113); दुर्गा प्रसाद विजयी वि. राजीव शर्मा 585(108)-358;

एच ग्रुप : विशाल मदान विजयी वि. सौरव कोठारी 449-349.




Post a Comment

Previous Post Next Post